महावीर जयंती उत्साहात साजरी रथयात्रा, सजीव देखाव्यांनी वेधले सर्वांचे लक्ष

Foto

औरंगाबाद: सकल जैन समाजाच्या वतीने आज भगवान 
महावीर यांच्या जयंतीनिमित्त सकाळी शहरातून रथयात्रा काढत भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत विविध सामाजिक व राष्ट्रीय प्रश्‍नांवर आधारित आकर्षक देखावे सादर करण्यात आले. या देखाव्यांनी शहरवासियांचे लक्ष वेधून घेतले.महावीर जयंतीनिमित्त आज सकाळी पैठणगेट येथून शोभायात्रा काढण्यात आली. बँडपथक, बैलगाडी, झांजपथक, ढोल-ताशांच्या गजरात रथयात्रा काढण्यात आली. यात सामाजिक, संदेश देणार्‍या सजीव देखाव्याने शहरवासियांचे लक्ष वेधले.  

याप्रसंगी सकल जैन समाजाचे अध्यक्ष राजेंद्र दर्डा, महापौर नंदकुमार घोेडेले, सकल जैन समाजाचे उपाध्यक्ष ललित पाटणी, किशनचंद तनवाणी, आ. सुभाष झांबड, आ.अतुल सावे, आ. संजय शिरसाट, माजी महापौर बापू घडामोडे, प्रदीप जैस्वाल, विकास जैन, जैन समाजाचे आचार्य महाश्रमणजी, आचार्य हेमसागरजी महाराज, प.पू. लोकेशमुनी म.सा., आचार्य श्री महाश्रमणजी यांच्या सुशिष्या साध्वीजी राकेशकुमारजी आदीठाणा, गौरवमुनीजी, सौरव मुनीजी, भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव समितीचे अध्यक्ष मुकेश साहुजी, कार्याध्यक्ष अनिल संचेती आदी मान्यवरांच्या उपस्थितीत शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी शोभायात्रेत रथात भगवान महावीर  यांची मूर्ती ठेवण्यात आली. यावेळी बॅण्डपथक, सनई, ढोल-ताशांच्या गजरात भगवान महावीर यांचा गजर करत ‘जिओ और जिने दो’, असा सामाजिक संदेश भक्‍तांनी दिला. यावेळी गुरुंनी शुभवचन दिले. ही शोभायात्रा पैठणगेट, टिळकपथ, 
मछलीखडक, सिटीचौक, शहागंज, गांधी पुतळा, राजाबाजार जैन मंदिरमार्गे काढण्यात आली. यावेळी सकल जैन समाजाचे कोषाध्यक्ष जी.एम. बोथरा, झुंबरलाल पगारिया, डॉ. शांतीलाल संचेती, सुनील राका, सुधीर साहुजी, दिगंबर क्षीरसागर, रतिलाल मुगदिया, चंदनमल पगारिया, अ‍ॅड. डी.बी. कासलीवाल, विलास साहुजी, संजय संचेती, रवी मुगदिया, जीनदास मोगले,  मदनलाल आच्छा, वृषभ कासलीवाल, विनोद बोकडिया, भारती बागरेचा, करुणा साहुजी, महासचिव नीलेश सावलकर, भावना सेठिया, राजेश  मुथा, मंगल पारख, नीलेश पहाडे, मंजू पाटणी, मंगल गोसावी, कविता  अजमेरा, पुष्पा बाफना, स्वप्निूल पारख, मनोज छाबडा, पुष्पा बाफना, पियुष कासलीवाल, नरेंद्र अजमेरा आदींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.

रॅलीने वेधले शहरवासियांचे लक्ष
आज सकाळी 6 वाजता महावीर राजाबाजार जैन मंदिर येथून वाहन रॅली काढण्यात आली. या वेळी रॅलीत समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. सदरील वाहन रॅली राजाबाजार जैन मंदिर येथून काढण्यात आली. यात टीव्हीसेंटर, चिकलठाणा, शिवाजीनगर, दशमेशनगर, रेल्वेस्टेशन, वाळूज, पंढरपूर, पुंडलिकनगर, सिडको, गारखेडा, छावणी, चित्तेगाव, 100 जैन रायडर्सने मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. ही रॅली बाबा पेट्रोलपंप येथून भगवान महावीर स्तंभापर्यंत काढण्यात आली. यावेळी सकल जैन समाजाचे अध्यक्ष राजेंद्र दर्डा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी महापौर नंदकुमार घोडेले, आ. सुभाष झांबड आदींची उपस्थिती होती.

सामाजिक देखाव्यातून जनजागृती
महावीर जन्मकल्याणक महोत्सवात शोभायात्रेत सजीव देखाव्यातून सामाजिक देखाव्यातून सामाजिक विषयांवर प्रकाश टाकून जनजागृती करण्यात आली. यात ‘जीवन में सफलता पाने के लिए, किताबोंसे दोस्ती करना चाहिए’ यातून वाचनसंस्कृती जोपासावी, अशी जनजागृती करण्यात आली. याशिवाय स्वच्छ शहर, सुंदर शहर, पाणी अडवा, पाणी जिरवा आदी सामाजिक प्रश्‍नांवर देखाव्यातून प्रकाश टाकून सामाजिक संदेश दिले.